रॅगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रॅगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बाहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट सर जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रॅगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. सदर प्रस्तुत पुस्तकात रॅगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद स्वरबद्ध केला आहे. या पुस्तकात 'रॅगेडी ॲन आणि फिडोंची सुटका दोन कथा' आहेत . रॅगेडी ॲन कथा मालिकेतील पहिले पुस्तक वाचकांना आवडेल ही आशा आहे.